मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाची अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काल, मंगळवारी येथील झोपडपट्टींवर बुलडोझर चालवण्यात आला. आज या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र आजच्या कारवाईत एका मशिदीवर तोडक कारवाई केल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि स्थानिक आमदार वरुण देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करण्यात आला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तेथे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लीम नरेटीव्ह तयार करायचा ही भाजपची जुनी स्ट्रॅटेजी आहे. त्याचा परत एकदा प्रयत्न केला गेला. जे काम रेग्युलर इन्फ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं, जे काम रेग्युलर इन्फ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं. त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला.
पुढे सरदेसाई म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून, आता भाजपाचा महापौर मुंबईत झालायं म्हणून डिमॉलिशन करण्यात आलं. आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे करण्यात आले. मग ह्याच्यामध्ये शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला असे काय काय व्हिडीओ तयार करुन म्हणजे दररोज व्हायरल करतात. आपण मुंबईमध्ये पाहिलं तर रोड व्हाइटनिंग करता, एसआरएच्या कामा करता, नाल्यांच्या व्हाइटनिंग करता, दररोज डिमॅलिश होत असतात. इन्फ्रास्ट्रक्चर करताना आपल्याला ते करावं लागतं. यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की, या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली सर्वे झाला होता. तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार अबाधित ठेवावे, त्यांचे राइट्स प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला सांगितलं की, सगळ्या घरांचा सर्वे हा झालेला नाही. 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते खरंतर त्यांची ही जबाबदारी होती. जर अर्धाच सर्वे झाला असेल तर तो त्यांनी पूर्ण करुन घ्यायला पाहिजे होता. पण ते जेव्हा निष्क्रीय होते तेव्हा काम केले नाही आणि मग तेव्हा माझ्या हे लक्षात आले तेव्हा मी डीव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेतली. त्यांना सांगितले की विकासाला अजिबात विरोध नाही.