Mahendra Thorve : ‘येत्या आठ दिवसांत भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणार’; आमदार महेंद्र थोरवेंचं विधान, तटकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

रायगड / कर्जत : महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष होत आले आहेत. परंतू अजूनही रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भर गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्रीपदी शिवसेनेचाच नेता होईल, असे सुतोवाच केले आहे.  आमदार महेंद्र थोरवे […]

Mahendra Thorve : ‘येत्या आठ दिवसांत भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणार’; आमदार महेंद्र थोरवेंचं विधान, तटकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

रायगड / कर्जत : महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष होत आले आहेत. परंतू अजूनही रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भर गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्रीपदी शिवसेनेचाच नेता होईल, असे सुतोवाच केले आहे. 

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, सुनील तटकरे आणि माझ्यामध्ये वैयक्तिक मतभेद नव्हते, राजकीय मतभेद होते. आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेबांनी सांगितलं की, दूरदृष्टी ठेवून पुढील कालावधीमध्ये काम करावं. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. महायुतीचा धर्म पाळायचं हे मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं आहे. त्याला तंतोतंत पाळण्याचे काम मी केलं आहे. मतभेद जर थांबवायचे असतील, तर पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांना देण्यात यावे, असे आम्ही तीनही आमदारांनी मिळून सांगितलं आहे. या संदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. येत्या आठ दिवसांत भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणार आहेत, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे.  

हेही वाचा : Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; अमित शाह, नितीन गडकरींना मोठी बढती? महाराष्ट्रातील 'या' बंडखोर नेत्यांना थेट संधी मिळण्याची शक्यता

पुढे थोरवे यांनी नमूद केले की, रायगडमध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा एकत्र काम करणार आहोत. महेंद्र दळवी यांची नाराजी खरोखरच योग्य आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नीला बसवायचे होते. मात्र आपापसातील मतभेदामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसवला गेला. त्यांचे संख्याबळ देखील तिन्ही पक्षाच्या तुलनेत कमी होते. शिंदेसाहेबांचा आदेश ऐकूनच महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीचा फॉर्म मागे घेतला, अशीदेखील माहिती महेंद्र थोरवे यांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number