स्वाभिमानाच्या बॅनरवर आमदार देवेंद्र भुयारांना स्थान नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्यातील वाद विकोपास पोहचला आहे. २४ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात राजू शेट्टी यांचा शेतकरी मेळावा आहे. मात्र, या मेळाव्याच्या स्वाभिमानीच्या बॅनरवर आमदार देवेंद्र भुयार यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता शेट्टी विरुद्ध भुयार असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. यातून […]

स्वाभिमानाच्या बॅनरवर आमदार देवेंद्र भुयारांना स्थान नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्यातील वाद विकोपास पोहचला आहे. २४ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात राजू शेट्टी यांचा शेतकरी मेळावा आहे. मात्र, या मेळाव्याच्या स्वाभिमानीच्या बॅनरवर आमदार देवेंद्र भुयार यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता शेट्टी विरुद्ध भुयार असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. यातून आता स्वाभिमानीत फूट पडण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या पक्षाचे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात देवेंद्र भुयार हे एकमेव आमदार आहेत. भुयार यांच्या मतदारसंघातील हिवरखेड येथे २४ मार्च रोजी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर लागले आहेत. मात्र, त्यावर आमदार देवेंद्र भुयार यांना स्थान देण्यात आले नाही.

राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. तर देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच राजू शेट्टी आणि देवेंद्र भुयार यांच्यातला वाद विकोपास जात असल्याचं या बॅनरवरून दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number