आमदार दळवींच्या पत्नीची अधिकाऱ्यांना मारहाण

अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण केली.

आमदार दळवींच्या पत्नीची अधिकाऱ्यांना मारहाण

रायगड : अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. अलिबागमधील आरसीएफ शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा घाट घातला जातो आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल पाठवला. त्या रागातून ही मारहाण झाली असल्याचे समजते. मात्र या संदर्भात कुठलीही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. आरसीएफ शाळा बंद होणार अशी बातमी पसरल्याने पालक शाळेत गोळा झाले होते. यावेळी शिक्षण विभागातील काही अधिकारीही आले होते. यावेळी अहवाल कुणी तयार केला याचा जाब या अधिकाऱ्यांना विचारण्यात येत होता. त्याचवेळी मानसी दळवी यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number