महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे ‘हयात’मध्ये शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक नाट्यमय रूपांतर रोजच्या दिवसात बघायला मिळत आहे. आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाच्या आमदारांंनी एकत्र येऊन शक्ति प्रदर्शन केले. तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही यावेळी उपस्थित होते. महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड झाली. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हाँल मध्ये संध्याकाळी ७ […]

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे  ‘हयात’मध्ये शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक नाट्यमय रूपांतर रोजच्या दिवसात बघायला मिळत आहे. आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाच्या आमदारांंनी एकत्र येऊन शक्ति प्रदर्शन केले.

तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही यावेळी उपस्थित होते. महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड झाली. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हाँल मध्ये संध्याकाळी ७ वाजता शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या आमदारनी यावेळी केला.

तीनही पक्षांच्या आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. ही तीनही हॉटेल जवळच्या अंतरावर आहेत. पण यांना पक्षनेत्यां व्यतिरिक्त कोणाला भेटण्यास दिले जात नव्हते. दर दोन ते तीन दिवसामध्ये यांना हॉटेल बदलावे लागत असल्यानं आमदारांमध्येही तणाव आणि अस्वस्थतेचे वातावरण होते. लवकर एकदा सरकार स्थापन व्हावे अशी आमदारांची इच्छा आहे. या शपथ विधीमध्ये आमदारांना एकजुटतेची शपथ देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number