आमदार बांगर पुन्हा एकदा संतापले

हिंगोली,१९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संतोष बांगर अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांसोबतच्या वादाचा तर कधी कोणाला धमकी देतानाचा त्यांंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता आमदार संतोष बांगर यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार संतोष बांगर एसटीच्या कंडक्टरला धमकी देताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील […]

आमदार बांगर पुन्हा एकदा संतापले

हिंगोली,१९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संतोष बांगर अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांसोबतच्या वादाचा तर कधी कोणाला धमकी देतानाचा त्यांंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता आमदार संतोष बांगर यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार संतोष बांगर एसटीच्या कंडक्टरला धमकी देताना दिसत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा डिग्रस पिंपरी बोराजा या गावातील विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नव्हती. बसच्या कंडक्टर कडून विद्यार्थिनींची अवहेलना होत होती. ही तक्रार घेऊन एक विद्यार्थिनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात गेली. तक्रार ऐकल्यानंतर आमदार बांगर यांनी आगार प्रमुखांना तत्काळ कार्यालयात बोलवले. नंतर आमदार बांगर यांनी आगार प्रमुखांच्या समोर या मुलींची कैफियत ऐकली, कंडक्टर आमची अवहेलना करतात अशी तक्रार विद्यार्थिनींनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली.

बांगर हे विद्यार्थिनीचे गाऱ्हाणे ऐकून संतापले व त्यांनी आगारातील संबंधिताला ऑफिसमध्ये बोलावून दम दिला. दमच दिला नाहीतर जो कुणी संबधित वाहक आहे. त्याला समजावून सांगा, त्याला दुसरीकडे टाका नाहीतर मी पायाखाली तुडवून मारेन म्हणत धमकी दिली. आमदार बांगर यांची जीभ घसरल्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number