भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार हे जाहीर केले आहे. मिताली राज आता आपले लक्ष फक्त विश्वचषकाकडे केंद्रीत करणार आहे. मिताली राजने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामान्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले आहे.
मिताली राजच्या नेतृत्त्वात असलेला भारतीय संघ मात्र विश्वचषक जिंकण्यास अयशस्वी ठरला आहे. मिताली राजने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या आधी टी- 20 आंतरारष्ट्रीय किक्रेटमध्ये 2,000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
टी- 20 आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा करणारी मिताली राज ही भारतीय महिला संघाची पहिली फंलदाज ठरली होती.मिताली राजने भारताकडुन 88 टी-20 सामन्याचे नेतृत्त्व केले आहे. टी-20 च्या करिअरमध्ये 37.52 च्या सरासरीने तिने 2364 अशा धावा केल्या आहेत. या मध्ये 17 अर्धशतकांचा समावेश होता.