Minister’s New Address: जाणून घ्या; मंत्र्यांचा नवा पत्ता

महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळाला आहे.

Minister’s New Address: जाणून घ्या; मंत्र्यांचा नवा पत्ता

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळाला आहे. तर पंकजा मुंडे यांना पुर्णकुटी बंगला मिळाला आहे.  त्याचबरोबर राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला मिळाला आहे. 

कोणत्या मंत्र्याला कुठला बंगला? 

मंत्री अतुल सावे यांना अ-३ शिवगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री अशोक उईके यांना अ-९ लोहगड देण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांना मेघदुत बंगला देण्यात आला आहे. मंत्री आशिष शेलार यांना रत्नसिंधू बंगला देण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे यांना प्रतापगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड देण्यात आला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे. मंत्री गणेश नाईक यांना ब-४ पावनगड हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांना ब-३ जंजीरा बंगला देण्यात आला आहे. मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला देण्यात आला आहे.

त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना ब-५ विजयदुर्ग बंगला देण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला देण्यात आला आहे. मंत्री जयकुमार रावल यांना चित्रकुट बंगला देण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number