मुंबई: राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये शिवसेना दसरा मेळावा घेणार अशी माहिती समोर आली. याबद्दल खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारले गेले. यावर संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, 'शिंदेंनी दसरा मेळावा अहमदाबादला किंवा सूरतला घ्यावा. त्यांच्या मेळाव्याला प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहांना बोलवावं. मुंबईतील दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली परंपरा आहे, त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा होत असून बाकी सर्व बोगस आहे'. एकनाथ शिंदेंचं नाव न घेता संजय राऊत म्हणाले की, 'त्यांनी भगवी शाल घेऊन फोटो लावले आहेत. आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे आहे एवढंच सांगायचं राहिलं आहे'. यावर मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा: Shivsena Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं; जाणून घ्या
उदय सामंत काय म्हणाले?
उदय सामंत म्हणाले की, 'संजय राऊतांचं वक्तव्य जनतेने मनावर घेतले नाही. ज्यांना 20 आमदार निवडून आणता आले नाही, त्याचं वक्तव्य तुम्ही प्रचंड मनावर घेता?' पुढे, राऊतांवर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले की, 'तुमच्यावर, आमच्यावर किंवा जनतेवर संजय राऊत काय बोलतात याने काही फरक पडतो का? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी सगळे शिवसैनिक दसरा मेळाव्यात यायचे'.