Chhagan Bhujbal : "…त्यामुळे राजकारणाचा खेळ करू नका" मनातील खदखद, मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भुजबळ वर्धापनदिनी भरभरून बोलले

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 27 वा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा दाखला देत अनेक मुद्दे आपल्या भाषणात मांडले.

Chhagan Bhujbal : &quot…त्यामुळे राजकारणाचा खेळ करू नका&quot मनातील खदखद, मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भुजबळ वर्धापनदिनी भरभरून बोलले

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 27 वा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा दाखला देत अनेक मुद्दे आपल्या भाषणात मांडले. सुरुवातीला कबड्डीचे खेळाडू म्हणत छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिमटे काढले. मात्र त्यानंतर भुजबळांनी देखील तटकरेंना टोला लगावला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 27 वा वर्धापन दिवस आज मुंबईत साजरा केला गेला.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, पार्थ पवार, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, अण्णा बनसोडे, अनिल पाटील यांच्यासह पक्षातील सर्व आमदार, खासदार, मंत्री तसेच राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पक्ष नाही तर ती संस्था आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे. हा पक्ष वाढवताना ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते अजितदादा आपल्यात नाहीत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या चरणी निष्ठा वाहायच्या आहेत’ असं म्हणत भुजबळांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी ज्या घडामोडी घडल्या त्या सांगितल्या. 

हेही वाचा- Sunetra Pawar : “आतापर्यंत दादांनी पक्षातील सर्वांचे हट्ट पुरवले, यापुढे अनावश्यक हस्तक्षेप केला तर…” सुनेत्रा पवारांचा सुचक इशारा

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, “पहिल्यांदा संकल्प आला पाहिजे मग संघर्ष केला पाहिजे मग समर्पण केल पाहिजे. पदं म्हणजे आळवावरचं पाणी, कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही. एस काँग्रेसचा समर्पण हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला होता. मी इतिहास का सांगत आहे ज्यांना इतिहास माहीत आहे तेच इतिहास घडवतात. शरद पवार यांना काँग्रेस मधून बाहेर काढण्यात आला होता. मी तेव्हा विधानपरिषदेवर विरोधीपक्ष नेता होतो. ए 10 बंगल्यात या पक्षाची स्थापना झाली आणि तिथेच इतिहास घडला आणि तो बंगला माझा विरोधी पक्षाचा होता. एफिडेवीट देखील आम्ही बनवले होते.’ये विरासत युही नही मिलती साथियो, कुछ ने सब दाव पे लगाया है'” 

“1999 ला अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता पण मी ठरवलं होत मी शरद पवार यांची साथ घेतली आहे त्यांना कधी सोडल नाही तेव्हा काँग्रेस कडून मला मुख्यमंत्री पद देण्याची ऑफर दिला होता. 1999 ला लाखो लोकांची सभा या मुंबईत घेतला होता. या पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो होतो. 1999 ला प्रीपोल निवडणूक या 6 महिन्या अगोदर घेण्यात आल्या त्यामुळे कमी निवडून आले. नाही तर तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता. अजित पवार यांच काम पुढे घेऊन जायचं आहे आणि संधी प्रत्येकाला मिळत असते त्यामुळे त्यांचं सोन करायचं की काय करताच हे तुम्ही ठरवा.”

“काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी मला काँग्रेसमधून अनेकांचे फोन आले. तुम्ही काँग्रेसमध्ये या, आजच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करतो अशी ऑफर देण्यात आली. पण मी ती नाकारली. हा पक्ष वाढवत असताना ज्यांनी रक्ताचं पाणी करून काम केलं, ते आज अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांचं योगदान शब्दात मांडता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्या निष्ठा आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहायच्या आहेत.”

हेही वाचा- Solapur NCP Sharad Pawar : सोलापूरात विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच पवारांच्या गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे 4 पैकी 3 आमदार भाजपच्या बैठकीला उपस्थिती

“एसआयआरच्या संदर्भात सजग झाला पाहिजे आणि बूथप्रमुख हा आपला प्रत्येक बूथ मधे झाला पाहिजे, आणि बीएलओ काय करत आहे याची माहिती आपल्याला पाहिजे. यशवंतराव चव्हाण बोलले होते राजकारण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे राजकारण करायचं आहे. हे मराठीच राज्य होणार आहे. पक्षापेक्षा मोठा कोणी नाही आहे. त्यामुळे खेळात राजकारण करू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका. आपल्याला पक्ष मोठा करायच आहे. काही झाल तरी पुढे लढायची तयारी ठेवली पाहिजे. मतभेद ठेवले पाहिजे पण मनभेद ठेवले नाही पाहिजे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number