Chandrashekhar Bawankule : "आमच्या प्रचारामध्ये आनंद व्यक्त केला, त्यात एवढं बोलायची काय गरज?" महापुरुषांच्या प्रतिमेसमोरील भोजपुरी नृत्याला बावनकुळेंच समर्थन

वॉर्ड क्रमांक 157 मधील भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचार कार्यक्रमात महिला भोजपुरी स्टाईल नाचण्यात आलेल्या प्रकारावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule : &quotआमच्या प्रचारामध्ये आनंद व्यक्त केला, त्यात एवढं बोलायची काय गरज?&quot महापुरुषांच्या प्रतिमेसमोरील भोजपुरी नृत्याला बावनकुळेंच समर्थन

महाराष्ट्रातील राजकारण हे अतिशय बिकट परिस्थितीचे झाले असून सध्या सुरु असलेल्या महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अशातच भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या एका उमेदवाराने चक्क प्रचारादरम्यान भोजपुरी स्टाईल नाचगाण्याचे आयोजन केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. वॉर्ड क्रमांक 157 मधील भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचार कार्यक्रमात महिलांच्या भोजपुरी स्टाईल डान्सचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा नाचगाण्याचा प्रकार महाराष्ट्रातील महापुरुष म्हणून ज्यांना पुजलं जात अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोरच घडला. यामुळे नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. पवन त्रिपाठीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर सध्या महाराष्ट्रातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा- BJP Campaign Controversy: महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेचा भाजपला सवाल
अशातच भाजपनेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, "तो आनंद व्यक्त करतात लोकं, त्यात गर्दीचा काय संबंध आहे. आमच्या प्रचारामध्ये आणि प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल तर त्यात एवढं बोलण्याची गरज काय आहे? शेवटी हा महिलांचा आनंद आहे त्यांनी तो व्यक्त केला असेल" चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी झालेल्या प्रकाराला समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Supriya Sule: बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस…; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी या प्रकाराचा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांसमोर अशा प्रकारे नाचगाणे करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? कार्यक्रमाचे संयोजक सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आहेत. अशा मानसिकतेची माणसे पवित्र मंदिरांच्या ट्रस्टवर नेमताना भाजपला लाज वाटली नाही का? सत्तेची मस्ती चढलेल्या या लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईकरांनी 'शिवटोला' द्यावा, असे आवाहन चित्रे यांनी आशिष शेलार यांना टॅग करत केले आहे. अशा प्रकारचे नाचगाण्याचे प्रचार हे सहसा यूपी, बिहार या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतात. सध्या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न डोळ्यासमोर असताना महाराष्ट्रातच मराठी महापुरुषांच्या प्रतिमेसमोर भोजपुरी डान्स सादर करण्यात आला आहे. या कृतीवर भाजपच्या मंत्र्यांनी मात्र समर्थन केल्याचं दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number