Bharat Gogawale On Raigad Guardian Minister : "फक्त डिक्लरेशन बाकी आहे, ते पण…" रायगड पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावलेंच मोठ वक्तव्य

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळत आहेत.

Bharat Gogawale On  Raigad Guardian Minister : &quotफक्त डिक्लरेशन बाकी आहे, ते पण…&quot रायगड पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावलेंच मोठ वक्तव्य

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेले दीड वर्ष नाव जाहीर न करता राखून ठेवण्यात आलं आहे.

शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे पालकमंत्री पदावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यामुळे रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- Sanjay Raut Solapur FIR : राऊतांचा पाय आणखी खोलात! जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल

या मुद्द्यावरून वेळोवेळी नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माणगाव येथे आयोजित प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोगावले म्हणाले, “पालकमंत्री पदाचं झालं आहे, फक्त डिक्लरेशन बाकी आहे, ते पण होऊन जाईल.”

त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number