एमआयएमची कार रॅली मुंबईत धडकली असून ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुंबईत रॅलीला रोखणार आहेत. मुस्लिम आरक्षणासाठी ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत रॅली काढण्यात आली. मुस्लिम आरक्षणासाठी अससुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत चांदवली येथे सभा घेण्यात येणार आहे. मात्र पोलिसांकडून एमआयएम रॅलीला अटकाव करण्यात येत आहे.
खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह वाहनांचा ताफा घेऊन वाशीच्या पुढे मानखुर्दपर्यंत पोहोचले आहेत. काही वेळातच सर्व ताफा चांदिवलीत दाखल होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी चांदीवली येथील एमआयएमची सभा होणार असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुस्लिमांना आरक्षण मिळण्याची एमआयएमची मागणी आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमकडून मुंबईच्या दिशेने रॅली निघाली आहे. मात्र मुंबईत जमावबंदी लावण्यात आली आहे. मुंबईत मोर्चा, रॅलीवर पोलिसांकडू बंदी घालण्यात आली आहे. मात्र एमआयएम रॅली काढण्यावर ठाम आहेत. ३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
एमआयएमच्या तिरंगा मोर्चाच्या अनुषंगाने मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यात देखील एमआयएम कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. तसेच मुंबईला तिरंगा यात्रेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड मालेगाव आणि धुळ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना चांदवड टोल नाक्यावर रोखण्यात आले.
मुंबईत रॅलीला परवानगी नाकारली आहे. दोन वेळा अडवल्यानंतर अटी-शर्तींसह एमआयएमची कार रॅली काढण्यात आली आहे. रॅली मुंबईच्या दिशेने निघालू असून मुंबईत मात्र प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.