मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या गोष्टीला MIM च्या इम्तियाज जलील यांनी मात्र पंकजा मुंडे यांची नौटंकी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणावर इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.
5 वर्षं सत्ता होती, तेव्हा काही केलं नाही आणि आता औरंगाबादमध्ये एकत्र आले आहात.
सत्ता होती, तेव्हा गोट्या खेळत होता का?
त्यावेळी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी तुम्ही काही केलं नाही.
सत्ता गेल्यावर ही नौटंकी कशासाठी? असा सवाल करत जनता काही इतकी मुर्ख नाही, असं जलील यांनी म्हटलंय.