पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गेले 8 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीय. जनजीवन विस्कळीत झालय.याचा परिणाम दुधावर झाला आहे. सांगली कोल्हापूरमधून येणारं दूध बंद झालंय, तर पुण्यातील कात्रज डेअरीमधील दूध संकलनावरही परिणाम झालेला आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून 15,000 ते 20,000 दूध संकलन कमी होत आहे.
रोज जवळपास सव्वा दोन लाख लिटर संकलन कात्रज डेअरीत होत असे.
मात्र पाऊस सुरू झाल्यापासून 1,85,000 संकलन आलं आहे.
यामुळे कात्रज डेअरीतील दुधजन्य पदार्थ बनवणं बंद केलं आहे.
नागरिकांना दूध पिशव्या देण्यावर भर दिला आहे. जेणेकरून सर्वांना दूध मिळेल.
जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर आणि ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्या भागातून दूध संकलन कमी झालय. पाऊस संपला की परस्थिती पूर्वपदावर येईल अस मत कात्रज डेअरी चेअरमन विष्णू हिंगे यांनी व्यक्त केलीय.