Microsoft Blocks Israeli Miletary : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय ; इस्रायली सैन्याच्या Cloud आणि AI सेवांवर आळा

मायक्रोसॉफ्टने इस्रायली सैन्याच्या क्लाऊड आणि एआय सेवांवरील वापराला आळा घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्पष्ट केले की अझूर प्लॅटफॉर्मचा वापर करून इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांवर मोठ्या प्रमा

Microsoft Blocks Israeli Miletary : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय ; इस्रायली सैन्याच्या Cloud आणि AI सेवांवर आळा

वॉशिंग्टन : जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्टने इस्रायली सैन्याच्या काही सेवांवर बंदी घातली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने मायक्रोसॉफ्टच्या अझूर (Azure) क्लाऊड कम्प्युटिंग सेवांचा वापर करून पॅलेस्टिनी नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवली होती. हे कंपनीच्या सेवा-नियमांचे उल्लंघन असल्याचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी स्पष्ट केले.

6 ऑगस्ट रोजी द गार्डियन आणि स्थानिक हिब्रू पोर्टल लोकल कॉल यांनी प्रकाशित केलेल्या संयुक्त तपासणीत उघड झाले होते की इस्रायली सैन्याच्या युनिट 8200 ने अझूर प्लॅटफॉर्मवर लाखो फोन कॉल्सची माहिती साठवली. हे युनिट सायबर युद्ध आणि गुप्तचर कारवायांसाठी ओळखले जाते. 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला आणि युनिट 8200 चे प्रमुख योसी सारियल यांच्या भेटीनंतर हा करार झाला होता. 2022 पासून सुरू असलेल्या या व्यवस्थेतून फोन कॉल्स ऐकणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि ऑपरेशनसाठी वापरणे शक्य झाले.

हेही वाचा – Donald Trump New Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा 100% टॅरिफ बॉम्ब ; औषध उत्पादनांवर थेट परिणाम 

या प्रणालीमुळे हवाई हल्ल्यांना दिशा देणे आणि कब्जाधीन प्रदेशातील लष्करी हालचालींना आकार देणे शक्य झाले, असे तपासणीत नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे ही माहिती नेदरलँड्स आणि आयर्लंडमधील अझूर सर्व्हरवर साठवण्यात आल्याचेही समोर आले. ब्रॅड स्मिथ यांनी सांगितले की कंपनी दोन मुख्य तत्वांवर ठाम आहे. पहिलं, नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवण्यासाठी तंत्रज्ञान पुरवले जाणार नाही, आणि दुसरं, ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल. या आधारावर संरक्षण मंत्रालयाच्या काही सदस्यता सेवा, विशेषतः क्लाऊड साठवण आणि एआय प्रणाली, रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Bangkok Road Sinkhole Video : बँकॉकमध्ये चार पदरी रस्ताच जमिनीत गडप झाला! थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल 

यापूर्वीही इस्रायलने गाझा युद्धादरम्यान मायक्रोसॉफ्टच्या सेवा मोठ्या प्रमाणावर वापरल्या होत्या. मे महिन्यात कंपनीने मान्य केले होते की त्यांनी सैन्याला काही प्रगत एआय आणि क्लाऊड सेवा पुरवल्या होत्या, मात्र त्यांचा थेट हल्ल्यांमध्ये वापर झाल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले होते.

मात्र, अलीकडील तपासणीत स्पष्ट झाले की काही सेवा अटींचे उल्लंघन करून वापरल्या गेल्या. या निर्णयामुळे विरोध करणाऱ्या काही माजी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले, तरीही इस्रायली सैन्यासोबतचे बहुतेक करार अजूनही कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number