म्हात्रे व्हिडिओ प्रकरण : आरोपी प्रकाश सुर्वे यांचा मुलगा?

आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ समाज माध्यामांवर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अऩेक आरोप-प्रत्यारोप यांचा बोलबाला सुरू झाला. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी खळबळजनक आरोप केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर खरा […]

म्हात्रे व्हिडिओ प्रकरण : आरोपी प्रकाश सुर्वे यांचा मुलगा?

आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ समाज माध्यामांवर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अऩेक आरोप-प्रत्यारोप यांचा बोलबाला सुरू झाला. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी खळबळजनक आरोप केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे?, असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. राज सुर्वे यांनी शीतल म्हात्रे यांचा संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रसारित केला होता. त्यामुळे राज सुर्वे यांना अटक करण्याची मागणी वरुण सरदेसाई यांनी केली आहे. तर, शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच हा व्हिडिओ बनवला असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस खऱ्या आरोपीला अटक करतील असे ते म्हणाले. तसेच, याप्रकरणी उद्धव गटाच्या नेत्यांवर आरोप करण्यात येत आहे. सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, हे नेते भाजपात गेले की त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात येते. जनता हे सर्व पाहत आहे, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.

वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यामांवर प्रसारित झाल्या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चार ते पाच मित्रांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे समर्थक साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number