मुंबईतील अॅक्वा लाईन 3 वरील मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे बाधित झाली ज्यामुळे ॲक्वा लाईन जवळपास एक तास विस्कळीत होती. ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा थांबवण्यात आल्या ज्यामुळे सीएसएमटी आणि इतर मेट्रो 3 स्थानकांवरील प्रवासी अडकून पडले. यावेळी तब्बल 40 ते 50 मिनिटांपासून मेट्रो एकाच ठिकाणी ठप्प होत्या.
दरम्यान गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी प्रवेशद्वारांसह काही स्थानकांमधील प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला होता. तर दुसरीकडे सेवा पूर्ववत करण्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यादरम्यान मेट्रो-3 च्या स्थानकांमध्ये प्रवेश करताच मोबाइलला नेटवर्क मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना फोन, मेसेज करणंही अवघड झाले आहे. या सर्व प्रकराने प्रवासी नागरिक संतप्त झाले.