‘मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार’

मुंबई, १० मे २०२३, प्रतिनिधी : मंगळावरी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३च्या भुयारी मार्गाची पाहणी केली. यावेळी, मेट्रो-३ मार्ग डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी […]

‘मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार’

मुंबई, १० मे २०२३, प्रतिनिधी : मंगळावरी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३च्या भुयारी मार्गाची पाहणी केली. यावेळी, मेट्रो-३ मार्ग डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई मेट्रो-३  टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मेट्रो-३च्या भुयारी मार्गाची पाहणी करत संपूर्ण कामाचा आढावा घेतला. मुंबई मेट्रो-३ मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला मेट्रोमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवा, ध्वनी प्रदूषण होणार नसल्याची काळजी घेतली असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number