राऊत धमकी प्रकरणी मयूर शिंदेला अटक

मुंबई, १५ जून,२०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याने राऊतांच्या सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी हा धमकी देण्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मयूर शिंदे हा संजय […]

राऊत धमकी प्रकरणी मयूर शिंदेला अटक

मुंबई, १५ जून,२०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याने राऊतांच्या सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी हा धमकी देण्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मयूर शिंदे हा संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचाही दावा केला जात आहे.

संजय राऊत धमकीप्रकरणी दि. १५ जून रोजी मयुर शिंदेंना अटक केली आहे. राऊतांनी स्वता:ची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तपासात मयूर शिंदेने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांनी स्वता:हून बनाव रचल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “राऊतांना धमकी देण्याची अक्कल गेंगस्टरला कुठली येतयं”

सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी हा बनाव रचला नाही. मयुर रिदिने राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी धमकीचे फोन करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत आणि सुनील राऊतांचे गॅगस्टर लोकांशी संबंध आहेत. त्यामुळे संजय राऊत हे स्वताहून धमकीचा बनाव रचत आहेत. तसेच संदीप देशपांडेंनी स्वतावर झालेल्यातील हल्ल्यातील पराडकर नावाचा आरोपी ही सुनील राऊतांच्या जवळता व्यक्ति असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राऊत हे राजकारणी आहेत की गैंगस्टर ?, असा प्रश्न देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number