Shevgaon Nagar Parishad Election : निवडणुकीनंतर शेवगावातील राजकीय गणितं बदलली; स्थानिक पक्षाच्या साथीने शिवसेनेची नगराध्यक्षपदावर वर्णी

अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत विजय मिळवला. 

Shevgaon Nagar Parishad Election : निवडणुकीनंतर शेवगावातील राजकीय गणितं बदलली; स्थानिक पक्षाच्या साथीने शिवसेनेची नगराध्यक्षपदावर वर्णी

शेवगाव, अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत विजय मिळवला. मात्र या विजयाच्या खऱ्या शिलेदार ठरल्या त्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे. ऐन वेळेला हर्षदा काकडे यांनी आपला जनशक्ती विकास पक्ष हा शिवसेना शिंदे गटात विलीन केला. हर्षदा काकडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने अरुण मुंडे यांची ताकद वाढली. त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे भविष्यातील शेवगावातील राजकीय गणित बदलली आहेत. आता शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा रोवत येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची देखील तयारी सुरू केल्याचा पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने शेवगाव शहरातील नागरिकांनी भाजपला धक्का दिला. तसेच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण सुसाट वाटचाल करेल आणि यावर जनता स्वार असेल, असं माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut on Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंचं ठरलं! मनपा युतीबाबत संजय राऊतांचं सूचक ट्विट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number