May 2025: मे महिन्यामध्ये कोणते दिवस महत्वाचे ? वाचा पूर्ण यादी

मे महिन्याची सुरुवात 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व गुजरात दिनाने होते. हा दिवस कामगार हक्क व राज्य निर्मितीच्या ऐतिहासिक घटनांची आठवण करून देतो.

May 2025: मे महिन्यामध्ये कोणते दिवस महत्वाचे ? वाचा पूर्ण यादी

मुंबई: मे महिना हा अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवसांसाठी ओळखला जातो. विविध क्षेत्रातील जागरूकता वाढवणे, प्रेरणा देणे आणि ऐतिहासिक घटना लक्षात ठेवण्यासाठी हे दिवस महत्त्वाचे असतात. चला तर मग, या महिन्यातील काही खास दिवसांची माहिती घेऊया.

हेही वाचा:Housefull 5 teaser release: मर्डर, मस्ती आणि मास्टर स्टारकास्ट घेऊन येतोय 'किलर कॉमेडी'चा धमाका

1 मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
1 मे रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांचं योगदान मान्य करण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच दिवशी 1960 साली महाराष्ट्र व गुजरात हे दोन स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन व गुजरात दिन म्हणून साजरा होतो.

3 मे – जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन
या दिवशी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पत्रकारांनी दिलेल्या निर्भीड बातम्या लोकशाही मजबूत करत असतात.

7 मे – जागतिक दमा दिन
हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. दमा या आजाराबद्दल जनजागृती करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

8 मे – रेड क्रॉस दिन आणि थॅलेसेमिया जागरूकता दिन
या दिवशी रेड क्रॉस संस्थेच्या सेवांचा गौरव केला जातो. थॅलेसेमिया या गंभीर रक्तविकाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.

11 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
1998 साली भारताने पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती. त्या स्मरणार्थ हा दिवस वैज्ञानिक प्रगतीचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो.

12 मे – मातृ दिन
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारला मातृ दिन साजरा केला जातो. हा दिवस मातृत्वाच्या प्रेम, त्याग आणि मायेचा गौरव करण्यासाठी आहे.

15  मे – आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
या दिवशी कुटुंबातील नाती, त्यांचं महत्त्व आणि सामाजिक स्थैर्य यावर भर दिला जातो.

17 मे – दूरसंचार व माहिती समाज दिन
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश हा दिवस देतो.

18 मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
या दिवशी संग्रहालयांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले जाते.

21 मे – अतिरेकविरोधी दिन
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यांची स्मृती आणि अतिरेकाविरोधातील लढ्याचे महत्त्व पटवण्यासाठी हा दिवस साजरा होतो.

22 मे – जैवविविधता दिन
या दिवशी पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी व जैविक घटकांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाते.

31 मे – तंबाखूविरोधी दिन
या दिवशी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय यावर जनजागृती केली जाते.

या सर्व दिवसांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जनजागृती, सन्मान आणि समाज सुधारणा. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित करून एक सशक्त आणि संवेदनशील समाज घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number