दिवाळीत झेंडू खातोय भाव

दिवाळीमुळे झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे.

दिवाळीत झेंडू खातोय भाव

नवी मुंबई  : दिवाळीमुळे झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवी मुंबईमध्ये एपीएमसी, वाशी व इतर ठिकाणी फुलांचा व्यवसाय सुरू केला असून १२० ते १६० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे.

प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीला नवी मुंबईमधील पदपथ व मोकळ्या जागांवर शेतकऱ्यांचा शेतकरी बाजार भरत असतो. पूर्वी फूल उत्पादक शेतकरी मुंबईमधील फूल बाजारात होलसेलमध्ये फुलांची विक्री करत होते. परंतु अनेक वेळा दर कमी मिळाल्यामुळे व काळी वेळेस फुलांची चोरी झाल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी नवी मुंबई, पनवेलमध्ये जागा मिळेल तेथे फुलांचा व्यवसाय सुरू केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number