‘मराठी तरुणांनो सैन्यात नोकऱ्या पटकवा’

केंद्र सरकारने तीन सुरक्षा सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. ही नवीन योजना चार वर्षांसाठी असणार आहे. मात्र, अग्निपथ योजनेवरून हिंसक पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला. मोदी सरकारने गेल्या तीन दिवसांमध्ये तीन मोठ्या घोषणा […]

‘मराठी तरुणांनो सैन्यात नोकऱ्या पटकवा’

केंद्र सरकारने तीन सुरक्षा सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. ही नवीन योजना चार वर्षांसाठी असणार आहे. मात्र, अग्निपथ योजनेवरून हिंसक पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला. मोदी सरकारने गेल्या तीन दिवसांमध्ये तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. अशातच, मराठी तरुणांंनी सैन्यात नोकऱ्या पटकवण्याचे आवाहन निवृत्त लष्करी अधिकारी करत आहेत.

निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी अग्निपथ योजेनेसंदर्भात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. अग्निपथ योजनेविरोधात ज्या युवकांनी हिंसाचार केला,  त्या युवकांना सैन्यभरतीत घेतले जाणार नसल्याचे निवृत्त ब्रिगेडिअर हेमत महाजन म्हणाले. ते म्हणाले, येत्या ३ महिन्यांतर सैन्यभरती होणार आहे. भारतातील ४६ हजार ते ५० हजार रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी सातारा, बुलढाणा, कोल्हापूर या सरकारी प्री रिक्रूटमेंट सेंटरमध्ये अडीच ते तीन महिने कमी खर्चात प्रशिक्षण दिले जाईल. ३ महिन्यानंतर होणाऱ्या सैन्यभरतीत लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय परीक्षा घेतली जाणार आहे. त्याची युवकांनी तयारी करावी, अशी प्रतिक्रिया निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिली.

अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर दोन दिवसातच केंद्राने पहिला बदल केला आहे. अग्निपथ योजनेतंर्गत अग्निवीरांना वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे. तसेच शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चार वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आसाम रायफल्समधल्या भरतीत १० टक्के जागा राखीव असतील, असे जाहीर केलं आहे.अग्निवीरांच्या वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत जाहीर करण्यात आली असून लष्करात अग्निवीरांच्या भरतीसाठी पुढील दोन दिवसांत नोटिफिकेशन निघणार आहे. तसेच डिसेंबर २०२२पर्यंतच पहिली तुकडी दाखल होईल, असा दावा लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी केला.

आंदोलनानंतर अग्निपथ योजनेत काय बदल?

अग्निविरांची वयोमर्यादा २१ वरून २३ वर करण्यात आली आहे.


अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आसाम रायफल्समधल्या भरतीत 10 टक्के जागा राखीव करण्यात आले.


त्यांच्यासाठी वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलतही जाहीर करण्यात आली.


लष्करात अग्निवीरांच्या भरतीसाठी अगदी पुढच्या दोन दिवसांत आदेश निघणार आहे.


डिसेंबर २०२२मध्ये पहिल्या तुकडीची भरती होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number