Manoj Jarange: तब्येत बरी नसतानाही थेट नारायण गडाच्या दिशेने, जरांगे कोणत्या मुद्द्यांवर लक्ष वेधणार?

Manoj Jarange: बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा होणार आहे. हा दसरा मेळावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Manoj Jarange: तब्येत बरी नसतानाही थेट नारायण गडाच्या दिशेने, जरांगे कोणत्या मुद्द्यांवर लक्ष वेधणार?

Manoj Jarange: बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा होणार आहे. हा दसरा मेळावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहेत. पण बुधवारी जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली असल्यामुळे ते मेळाव्याला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र मेळाव्या हजर राहणार असल्याचे स्वत: जरांगे पाटलांनीच स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील बीड येथील नारायण गडावरील दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.   

हेही वाचा: Shivsena Thackeray Dasara Melava : ‘..हा खरा विजयादशमीचा उत्सव आहे’; ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंची राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बुधवारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनोज जरांगे पाटील हे तापाने त्रस्त असल्याने त्यांच्या उपचार सुरु होते. पण आता जरांगेंची तब्येत बरी नसताना देखील ते दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.  त्यामुळे आता दसरा मेळाव्यात जरांगे काय बोलतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number