Manoj Jarange: मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल, दसरा मेळाव्यासंदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर

महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल, दसरा मेळाव्यासंदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे. जरांगेंना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे तापाने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

2 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्याला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले होेते. त्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे जरांगे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र जरांगेंची तब्येत ठीक नसल्याने गुरुवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला ते हजर राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जरांगे पाटील यांनी स्वत: गुरुवारच्या दसरा मेळाव्याला नारायण गड येथे जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गुरुवारच्या दसरा मेळाव्याला नारायण गड येथे जाण्यावर जरांगे ठाम आहेत. अ‍ॅब्युलन्समधून जाणार परंतु दसरा मेळाव्याची परंपरा मोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Abu Azmi On Marathi : 'मराठीची काय आवश्यकता…?, अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे आक्रमक

जरांगे पाटील यांची तब्येत ठीक नाही. परंतु नारायण गड येथे त्यांचा दसरा मेळावा होणार आहे. आजारी असलो तरी दसरा मेळाव्याला जाणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number