मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार

बीड : विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मागणीचा सत्ताधाऱ्यांना फटका बसेल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात सत्ताधारी महायुती ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेत कायम राहिली आहे. निकाल जाहीर झाल्यावर मनोज जरांगे यांनी परत एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. सरकार स्थापन झाले की लगेच आंदोलन सुरू करणार, असे जरांगेंनी जाहीर केले.

आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने बेमुदत उपोषण करण्याची तयारी करावी. एकजुटीने आणि एकदिलाने आंदोलन करावे असे आवाहन जरांगे यांनी केले. यावेळी आरक्षणासाठी सामूहिक उपोषण केले जाईल, असे जरांगेंनी जाहीर केले. या आंदोलनासाठी शेतीचं काम पूर्ण करुन सर्वांनी अंतरवाली सराटीत एकत्र यावे, असे आवाहन जरांगेंनी केले. 

मराठा आरक्षण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ॲड. डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका केली. त्यांचे पती ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. सुनावणी सुरू असताना उद्धव यांच्या राजकीय निर्णयांमुळे महाराष्ट्रात मविआची सत्ता आली. महाविकास आघाडी सत्तेत असताना सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती करण्यात आली. हे वकील आरक्षण राखण्यात अपयशी ठरले. नंतर जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे की नाही याचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. या अहवालाआधारे महायुती सरकारने मराठा समाजाला विधानसभेत ठराव मंजूर करुन दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. हे आरक्षण मिळाले तरी जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number