जरांगेच्या तब्येतीची काँग्रेसला काळजी

आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. पण काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

जरांगेच्या तब्येतीची काँग्रेसला काळजी

अंतरवाली सराटी : आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. पण काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. अंतरवाली सराटी येथे पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांनी बंद दाराआड चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रत्येक राजकीय पक्षाने आरक्षणाच्या मुद्यावर तसेच मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका लेखी स्वरुपात कळवावी असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला अनुपस्थित असलेल्या काँग्रेसने बैठकीची माहिती मिळाली तरी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका लेखी स्वरुपात राज्य शासनाला कळवलेली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number