Devendra Fadanvis On Manoj Jarange Patil : जरांगेंचं भरउन्हात उपोषण! मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर

मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु झाले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Devendra Fadanvis On Manoj Jarange Patil : जरांगेंचं भरउन्हात उपोषण! मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर

मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु झाले आहे. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावेळी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणा शेजारी एक रिंगण आखले आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Manoj Jarange Patil Protest : इथे रखरखत्या उन्हात जरांगेंच उपोषण सुरु, तिथे आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग अडवला

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे, सरकारने वारंवार निर्णय घेतला आहे प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आले तेव्हा सरकारने निर्णय घेतला, आणि या संदर्भात मी एवढेच सांगेल की सरकारचे भूमिका पारदर्शक आहे, सकारात्मक आहे आणि ते भूमिका सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारचे भूमिका सकारात्मकच असेल… आमचा सरकार सर्व समाजाकरिता सकारात्मकपणे काम करणारे सरकार आहे, आम्ही एकमेकांना समोर आणून भांडण करत नाही, सगळ्यांचा फायदा कसं होईल याचा विचार करतो आणि मराठा समाजाविषयी जेवढे निर्णय मी आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे निर्णय इतिहासात कधीही झाले नाही आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू…

फक्त हे घेत असताना देशाचे संविधान, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय याचे पालन करावे लागेल, त्या निर्देशाचे पालन न करता जर एखादा निर्णय करता घेतला तर तो निर्णय टिकणार नाही केवळ प्रसिद्धी मिळेल, त्यामुळे संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या कसोटीवर जे जे निर्णय घेता येतील ते कसोटीवर घेणारा… अशा प्रकारचे एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला द्यायचा असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही… आता चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घेण्यास तयार आहोत…”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number