Manoj Jarange on Devendra Fadanvis: ‘मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू नाहीत पण…’, देवेंद्र फडणवीसांबद्दल स्पष्टच बोलले मनोज जरांगे

जरांगेंच्या 10 मागण्यांवर काय आश्वासन देण्यात येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Manoj Jarange on Devendra Fadanvis: ‘मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू  नाहीत पण…’, देवेंद्र फडणवीसांबद्दल स्पष्टच बोलले मनोज जरांगे

भाजपचे नेते प्रसाद लाड हे अंतवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. जरांगेंच्या 10 मागण्यांवर काय आश्वासन देण्यात येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

 या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की,  “अनेक लोकांना वाटते की मी केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. पण मुख्यमंत्री  आमच्यासाठी शत्रू किंवा दुश्मन नाही. जर ते आमचे शत्रू असते, तर याच मराठा समाजाने त्यांना निवडून दिले नसते”,  असे सांगत जरांगे यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही वैयक्तिक द्वेषापोटी नव्हे, तर समाजाच्या आणि मुलांच्या हक्कासाठी भांडत आहेत.

त्याचप्रमाणे,  प्रसाद लाड यावेळी म्हणाले की, ‘अनेकदा माझे आणि मनोजदादांचे वाद झाले आहेत. पण आरक्षण मिळालं ते मनोजदादांच्या आंदोलनामुळेच. फडणवीसांना दादांनी समजून घेणं गरजेचं आहे. 30 मे रोजी जरांगेंनी आंदोलन करु नये’, असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number