मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोष पुकारले होते. अंतरवाली येथील एका शेतात रखरखत्या उन्हात बाज टाकून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी अनेक मराठा आंदोलक अंतरवालीमध्ये दाखल झाले होते. मात्र आंदोलन संपवून अंतरवाली सराटी येथून इंदापूरकडे परत जात असताना एका आंदोलकाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मराठा सेवक संतोष पांडुरंग माने आणि मराठा सेवक बिपिन नारायण मोरे यांची कार उभ्या ट्रकला जाऊन धडकली असून यामध्ये रामचंद्र जमदाडे याचा जागेच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी तात्काळ बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अपघातात मराठा सेवक रामचंद्र शंकर जमदाडे यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत असलेले दोन बांधव गंभीर जखमी झाले असून दोघे लोटस हॉस्पिटल बीड ICU मध्ये ऍडमिट आहेत.
हेही वाचा – Manoj Jarange Patil: मोठी बातमी! विखे-पाटलांची शिष्टाई यशस्वी; अखेर जरांगेंचं उपोषण मागे
मराठा सेवक संतोष पांडुरंग माने आणि मराठा सेवक बिपिन नारायण मोरे हे दोघे गंभीर जखमी आहेत. लोटस हॉस्पिटल बीड येथे उपचार सुरू आहेत.