Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे आणि क्रीडा संबंध काय? अंजली दमानियांचा सवाल

रमी खेळल्याच्या वादानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते बदललं; अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका केली, विरोधकांकडूनही संताप व्यक्त.<br/><br/>

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे आणि क्रीडा संबंध काय? अंजली दमानियांचा सवाल

Manikrao Kokate: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर अखेर त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण खाते आता कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना कोकाटे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती आणि कोकाटे यांचा राजीनामा मागितला होता. मात्र राजीनामा न घेता त्यांचं खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीही माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. या घटनेने मंत्रिमंडळातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असले तरी व्हिडिओमुळे या वादाला उधाण आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करत कोकाटे यांचं खाते बदलण्यात आलं आहे. 

अंजली दमानियांनी सुद्धा यावर सडकून टीका केली आहे.  ‘माणिकराव कोकाटे आणि क्रीडा संबंध काय?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. 

'कान्स'च्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा अस्सल मराठी ठसका! फोटो पाहिलात का?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number