BMC Election : वाजत-गाजत, शक्तीप्रदर्शनासह मंगेश पांगारे यांनी दाखल केला स्वतंत्र उमेदवारी अर्ज; शिवसेनेने संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यानं पांगारे नाराज

मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक 4 मधून शिवसेनेने संजय घाडी या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

BMC Election : वाजत-गाजत, शक्तीप्रदर्शनासह मंगेश पांगारे यांनी दाखल केला स्वतंत्र उमेदवारी अर्ज; शिवसेनेने संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यानं पांगारे नाराज

मुंबई : मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक 4 मधून शिवसेनेने संजय घाडी या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या निर्णयामुळे नाराज झालेले शिवसेनेचे उप-विभागप्रमुख मंगेश पांगारे यांनी उघड बंड पुकारत स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मंगेश पांगारे यांनी वाजत-गाजत, मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप पांगारे यांनी केला आहे.

हेही वाचा : PMC Election: अजित पवारांना गुन्हेगारीमुक्तीच्या दाव्याचा विसर? मारणेनंतर आता आंदेकर टोळीच्या दोन महिलांना राष्ट्रवादीचे तिकीट

या बंडखोरीला आता मुंबई डबेवाला असोसिएशनचाही जाहीर पाठिंबा मिळाला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मंगेश पांगारे यांच्या समर्थनार्थ पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “डबेवाला असोसिएशनच्या कुटुंबातील डबेवाल्याचा मुलगा नगरसेवक होणार, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे. डबेवाला असोसिएशनच्या पाठिंब्यामुळे मंगेश पांगारे यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले असून, मागाठणे परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे वार्ड क्रमांक 4 मधील निवडणूक आता अधिकच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number