ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं हे सलग त्यांचं तिसरं वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने विजय मिळवला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. ममता यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपलं प्राधान्य कोरोनाविरुद्धचा लढा हेच असेल असं त्या शपथ घेतल्यावर […]

ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं हे सलग त्यांचं तिसरं वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने विजय मिळवला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

ममता यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपलं प्राधान्य कोरोनाविरुद्धचा लढा हेच असेल असं त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या, तर उर्वरित सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number