अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. रविवारी इंडियानामधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. शस्त्र बाळगणाऱ्या एका सामान्य नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये हा गोळीबार झाला. या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता यासंबंधी पोलीस शोध घेत आहेत. येथील पोलिस […]

अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. रविवारी इंडियानामधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. शस्त्र बाळगणाऱ्या एका सामान्य नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला ठार केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये हा गोळीबार झाला. या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता यासंबंधी पोलीस शोध घेत आहेत.

येथील पोलिस अधिकारी जिम इसॉन यांनी या घटनेबाबत माहिती देतांना सांगितले की, या घटनेतील जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी पोहचले. तर येथील महापौर मार्क म्हणाले, सध्या परिस्थीती नियंत्रणात असून हल्लेखोर ठार झाला आहे. आम्ही कमांड पोस्टच्या माध्यमातून चर्चा करत असून सध्या धोका टळला आहे.

हल्लेखोराने फूड कोर्टवर रायफलने गोळ्या झाडल्या होत्या. या महिन्याच्या सुरुवातीला इंडियानामध्येच गोळीबाराची दुसरी घटना घडली होती. यामध्ये हल्लेखोराने 10 जणांवर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्रेनियानाच्या गॅरीमध्ये घडली. यापूर्वी अमेरिकेत शिकागो येथे स्वातंत्र्यदिनी गोळीबार झाला होता. फ्रीडम परेडमधून बाहेर पडत असताना अचानक गोळीबार झाला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 24 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने छतावरून गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोराला पकडण्यात आले. ते 22 वर्षांचे होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number