Attack On Sharad Pawar Gat Member : माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हा हल्ला राजकारणातून झाला…’

बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Attack On Sharad Pawar Gat Member : माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हा हल्ला राजकारणातून झाला…’

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी 

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण का झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारहाण झालेले नितीन तावरे हे माळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! पाच लाख उचल वसूल करण्यासाठी ऊसतोड मजुराचं अपहरण; मुकादमासह तिघांवर गुन्हा दाखल

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आमच्या पक्षाच्या माळेगांव येथील शहराध्यक्षांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. शासनाने हल्ला करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे. हा हल्ला राजकारणातून झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

नितीन तावरे यांना बुधवारी सायंकाळी मारहाण झाली. या घटनेने माळेगावात वातावरण तापले. राजकीय कारणांतूनच मारहाण झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मारहाणीची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी राजकीय कारणांतूनच मारहाण झाल्याचे सांगितले जाते. माळेगावात नगराध्यक्षपदासाठी एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number