Raj Thackeray : ‘तिकडे दोन गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का?’; राज ठाकरेंचा गुजराती – जैन समाजाला थेट इशारा

मुंबई : मालाड येथे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा राज ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला. प्रतिनिधींनी या घटनेबद्दल मनापासून […]

Raj Thackeray : ‘तिकडे दोन गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का?’; राज ठाकरेंचा गुजराती – जैन समाजाला थेट इशारा

मुंबई : मालाड येथे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा राज ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला. प्रतिनिधींनी या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत, कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. दरम्यान, वर दोन गुजराती बसले आहेत, म्हणून वाट्टेल ते कराल का?, असा इशाराही दिला.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंनी राम मंदिरात दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊतांनी केली सखोल चौकशीची मागणी

यावर राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि छत्रपतींच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित करत शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत समज दिली. मुंबईत काही ठिकाणी मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत असून, त्यामुळे मराठी आणि जैन समाजामध्ये विनाकारण तणाव निर्माण होत आहे. असे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच जैन समाजाच्या शिष्टमंडळाने भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number