Paydhooni Family Death : पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट! आतापर्यंत 100 हून अधिक व्यक्तींचे जबाब, पण पोलिसांना वेगळाच संशय

मुंबईतील पायधुनी येथे एका कुटुंबातील चार जणांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक गहन होत चालाल आहे. पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

Paydhooni Family Death : पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट! आतापर्यंत 100 हून अधिक व्यक्तींचे जबाब, पण  पोलिसांना वेगळाच संशय

26 एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या दोन मुली आयेशा व झैनब यांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. चौघांनी आदल्या रात्री कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर कलिंगडामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान मुंबईतील पायधुनी येथे एका कुटुंबातील चार जणांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक गहन होत चालाल आहे.

हेही वाचा- Bandra Demolition: वांद्रे झोपडपट्टी अतिक्रमण प्रकरणात पोलिसांवर दगड फेक! यात 3 पोलिस कर्मचारी जखमी तर 7 आरोपींना ताब्यात

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 100 हून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. घरातून जप्त केलेले खाद्य मीठ पुन्हा FSL कडे तपासणीसाठी पाठवले असून FDA अहवालात इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. FSSAI अहवालात कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळल्याची पुष्टी केली गेली आहे. जेजे हॉस्पिटलच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात झिंक फॉस्फाइड विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

त्यामुळे या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूच कारण हे कलिंगडावर झिंक फॉस्फाइड मिसळलेले मीठ शिंपडल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या या प्रकरणावर पोलिस आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही शक्यतांवर तपास करत आहेत. तर विष घरातील व्यक्तीने मिसळले की बाहेरील व्यक्तीचा यात सहभाग होता, याचाही तपास सुरू आहे. त्याचसोबत विष ठेवलेली मूळ डबी किंवा कंटेनर नष्ट केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. थेट भौतिक पुरावे अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number