अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूकीची जंगी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीकडून सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला आहे. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी या करीता तसेच अर्ज मागे घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सकपाळ यांना फोन केला होता. अर्ज मागे घेण्यासंदर्भातला हा सुनेत्रा पवार यांचा दुसरा फोन असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा- Ambadas Danve: ‘निवडणूक बिनविरोध करणे ही संस्कृती नाही…’; बारामती पोटनिवडणुकीवरून अंबादास दानवे यांचं मोठं विधान
त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील कॉंग्रेस हर्षवर्धन सकपाळ यांची आज भेट घेतली असल्याचं समोर आलं आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार नाना चौक येथील सर्वोदय आश्रमात दाखल झाले होते. बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रयत्न सुरू केले असून रोहित पवार यांनी देखील कॉंग्रेस हर्षवर्धन सकपाळ यांची आज भेट घेतली.
हेही वाचा- Ashok Kharat Case : खोटी भविष्यवाणी, कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात, त्याच जमिनीवर उभारले ईशानेश्वर मंदिर; खरातचा आणखी एक कारनामा उघड
रोहित पवार यांच्या भेटीनंतर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांशी हर्षवर्धन सकपाळ यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोट निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा सर्वस्वी अधिकार प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडेच आहे. रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या बंद दाराआड झालेल्या या चर्चेत रोहित पवार यांनी काँग्रेसला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच बारामती पोटनिवडणुकी दरम्यान राजकीय हालचालींना वेग आले असून महाविकास आघाडीत समन्वयाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.