गाण सम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. दरम्यान त्यांच्या दु:खद निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी दिली. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्र, राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराला सर्व राजकीय आणि इतर क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती लावली होती. मात्र यावेळी कॉंग्रेस पक्षातील नेते उपस्थिती राहू शकले नाही. याचपार्श्वभूमिवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शोकपत्र पाठवत कुटुंबाचे सांत्वन केले होते. दरम्यान यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली आहे.
सोनिया गांधी यांनी या पत्रात आनंद भोसले यांच्यासहे हेमंत भोसले यांचे देखील सांत्वन केले आहे. मात्र आशा ताईंचे पुत्र हेमंत भोसले यांचे निधन 11 वर्षापूर्वी 2015 साली कर्करोगामुळे झाले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी आशा भोसले यांच्या मृत पुत्र हेमंत भोसले यांच्या नावाने पत्र आल्याने ही गंभीर बाब समजली जात आहे.