मुंबई : महायुतीच्या वचननाम्याची झलक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन दिली. या ट्वीटमध्ये ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ असे नमूद करत लवकरच वचननामा जाहीर करणार असल्याचे संकेत महायुतीच्यावतीने फडणवीस यांनी दिले.
फडणवीसांनी ट्वीट केलेल्या वचननाम्यानुसार महायुती सत्तेत आल्यावर महिला, शेतकरी, वृध्दांना भरभरुन मदत देणार आहे. सध्या महायुती सरकार महिला, शेतकरी, वृध्दांना मदत देत आहे. या मदतीत वाढ केली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले आहे. विकासाचे व्हिजन २०२९ हे प्रारुप सादर करण्यावरही महायुतीचा भर दिसतोय.
महायुतीच्या जाहीरनान्यात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात सामील करण्याची घोषणाही करण्यात येणार आहे.
महायुतीचा वचननामा!
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! 1. लाडक्या बहिणींना ₹2100
प्रत्येक महिन्याला ₹ 1500 वरून ₹2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन ! 2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ₹15,000… pic.twitter.com/4bRlKO4OMv — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 5, 2024
काय असेल जाहीरनाम्यामध्ये?