महाराष्ट्राची वस्त्रोद्योगाकडे प्रगतीची वाटचाल

महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राची प्रगती आणि विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राची वस्त्रोद्योगाकडे प्रगतीची वाटचाल

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राची प्रगती आणि विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात टेक्नीकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासोबतच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ (MSTDC) स्थापन करण्याचे आणि नवी दिल्लीमध्ये आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचा सहभाग सुनिश्चित करण्याची सूचना दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरुची पत्रे मागविण्याचा आदेश दिला आणि स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश दिले. यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.त्यांच्या सूचनांमध्ये हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी दिली. तसेच राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करण्याबाबत योजना तयार करण्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार भारती यांच्या सहकार्याने “करघा” या पारंपारिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करण्याचीही सूचना दिली. यामुळे भारतीय वस्त्रोद्योगाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जनतेपर्यंत पोहोचविला जाईल. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करण्यावरही त्यांनी भर दिला. राज्यातील सूतगिरण्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेतला. यावेळी अन्नप व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील नव्या योजना आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टाकली जाणारी पावले दाखवली गेली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number