मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात ४६१ महिला आमदारांनी सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३६३ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. राज्यातील विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, एकूण ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नोंदणीच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात एक हजार पुरुष मतदारांमागे ९३६ महिला मतदार आहेत. राज्यात एकूण ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आणि ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष मतदार आहेत.