Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा मास्टरस्ट्रोक! रवींद्र चव्हाणांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून रवींद्र चव्हाण यांनी 17-17 जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक 18 जूनला होणार आहे.

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा मास्टरस्ट्रोक! रवींद्र चव्हाणांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

Vidhan Parishad Election: महाराष्ट्रात आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून 18 जून रोजी होणाऱ्या या निवडणुकांबाबत महायुतीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. एकूण 16 विधान परिषदेच्या जागांसह नागपूरमधील एका पोटनिवडणुकीसाठीही महत्त्वाची लढत होणार आहे. भाजप नेते आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार जनहिताचे निर्णय घेत प्रभावीपणे काम करत आहे. शेतकरी आणि श्रमिकांच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे राज्यात सरकारबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीची निवडणूक रणनीती ठरली

या निवडणुका महायुतीने एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाबाबत सर्व पक्षांमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज 1 तारखेला दाखल करण्यात आले असून ४ तारखेला अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आली असून मतदारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

मतदारांसाठी स्पष्ट संदेश

या निवडणुकीत मतदारांनी पहिल्या पसंतीचे मतदान महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापती हे मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असतील. काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी पक्षाने त्यांच्याशी संवाद साधून अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात पक्ष संघटनेत त्यांचा विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार (जाहीर यादी)

महायुतीकडून विविध मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत:

  • नागपूर: राजीव पोतदार

  • भंडारा: अविनाश ब्राह्मणकर

  • चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखानी

  • अमरावती: प्रवीण पोटे

  • सोलापूर: राजेंद्र राऊत

  • अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे

  • जळगाव: नंदकिशोर महाजन

  • सांगली-सातारा: धैर्यशील कदम

  • नांदेड: अमर राजूरकर

  • धाराशिव-बीड: बसवराज पाटील

  • संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट

  • ठाणे: रवींद्र फाटक

  • यवतमाळ: दुश्यंत चतुर्वेदी

  • परभणी: सय्यद खान

  • नाशिक: नरेंद्र दराडे

  • रायगड: अनिकेत तटकरे

  • पुणे: विक्रम काकडे

निवडणुकीत विजयाचा विश्वास

रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना एकत्रित पाठिंबा देत 17-17 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय ठेवून निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number