महाराष्ट्र लोकसेवा आयोग : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेचा घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६६६ पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ची जाहिरात जारी केली आहे.  २९ ऑक्टोबरपासून दुपारी २ वाजल्यापासून उमेदवार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२१साठी अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर असेल. या […]

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेचा घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६६६ पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ची जाहिरात जारी केली आहे.

 २९ ऑक्टोबरपासून दुपारी २ वाजल्यापासून उमेदवार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२१साठी अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर असेल. या परिक्षेच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ रुपये परीक्षा शुल्क आकारावे लागेल तर मागासवर्गीय उमेदवारांना ३४४ रुपये शुल्क आकारावे लागणार आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३७६ जागांची भरती, राज्य कर निरीक्षक १९० जागा आणि सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी १०० जागांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब संवर्गातील मुख्य परीक्षा येत्या २२ जानेवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संवर्गातील मुख्य परीक्षा २०२०चा संयुक्त पेपर २२ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. तर पोलिस उप निरीक्षक पेपर दोन २९ जानेवारी, सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर दोन ५ फेब्रुवारी, आणि निरीक्षक पेपर दोन १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number