BMC Elections : धाकधूक वाढली, घडामोडींना वेग ! मुंबई महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

BMC Elections : धाकधूक वाढली, घडामोडींना वेग ! मुंबई महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

आता 11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप व त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याच्या पद्धतीबाबत नियमावली जाहिर केली होती. 

आता राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणूकांच्या आरक्षण निश्चिती व  सोडत कार्यक्रमाबाबत अधिसूचना काढली आहे. वॉर्ड आरक्षण बदलल्यास अनेक वर्ष विकासकामे केलेल्या नगरसेवकांना दुसऱ्या वॉर्डचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरला प्रारूप प्रसिद्ध होईल

हेही वाचा – EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज 

पालिकेच्या 227 जागांपैकी अनुसूचित जाती 15, अनुसूचित जमातीसाठी 2,इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा तर उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतील. यात महिलांसाठी 50 टक्के आरक्षित आहेत याचाच अर्थ जवळपास 114 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे. 

हेही वाचा – EC On Maharashtra Election Date Announcement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी 

या सोडतीनंतर मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाला वेग येणार असून, कोणता वॉर्ड कोणत्या आरक्षणाखाली जाणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहणारे उमेदवार यांच्यासाठी ही सोडत अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number