Maharashtra Monsoon Update: वारं फिरलं! ‘या’ दिवशी कोसळणार धो-धो पाऊस, पुढील काही दिवसांत…

दरम्यान, पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारमध्ये मॉन्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update: वारं फिरलं!  ‘या’ दिवशी कोसळणार धो-धो पाऊस, पुढील काही दिवसांत…

गेल्या काही दिवसांपासून 15 जूनला राज्यात मान्सून दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मॉन्सून बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत असून तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये त्याची प्रगती दिसून येत आहे. मात्र अरबी समुद्रात गेल्या आठवडाभरापासून मॉन्सूनची स्थिती स्थिर असून तो पुढे सरकत नसल्याचे दिसते.

 ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे, कारण त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन आणखी लांबणीवर पडू शकते. दरम्यान, पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारमध्ये मॉन्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि विदर्भ भागात आज उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामानात बदल दिसून येऊ शकतो. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीच सावध करत अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात मॉन्सूनची प्रगती सुरू असली तरी वातावरणातील अनिश्चिततेमुळे चिंता वाढली आहे. येणारे काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

राज्यात मॉन्सून 20 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप मॉन्सूनवर अवलंबून राहून पेरण्या सुरू केलेल्या नाहीत. राज्यात लवकर मॉन्सून येणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. मात्र सध्या अरबी समुद्रात मॉन्सूनची हालचाल थांबलेली असून पुढे सरकण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. जर पुढील 2 ते 3 दिवस अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती बदलली नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जून महिना कोरडा जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number