Municipal Corporation Election: महाराष्ट्रात सभांचा पाऊस; फडणवीस, शिंदे, अजित पवार मैदानात, आजचा रविवार ठरणार निर्णायक

नागपुरात पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या थेट घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

Municipal Corporation Election: महाराष्ट्रात सभांचा पाऊस; फडणवीस, शिंदे, अजित पवार मैदानात, आजचा रविवार ठरणार निर्णायक

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला असून आज प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच राजकीय पक्षांसाठी 'आर या पार'ची लढाई ठरत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी आज ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होत आहे. सुमारे दोन दशकांनंतर दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या 'शिवशक्ती' सभेकडे लागले आहे. मैदानावर झळकलेले भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता मुंबईत आज राजकीय इतिहासाचे नवे पान लिहिले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सत्तेत असलेल्या महायुतीनेही मुंबईसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महायुतीचा मुंबईसाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. मुंबईच्या विकासाचा रोडमॅप मांडताना महायुती कोणत्या नव्या घोषणा करते, याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईतील 'मराठी माणूस' आणि 'विकास' या दोन मुद्द्यांवरून आज शिवाजी पार्क आणि सह्याद्री अतिथीगृह अशा दोन्ही ठिकाणी राजकीय खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Yashomati Thakur: “दादा, तुमचा वापर…” अजित पवारांच्या 'त्या' विधानावर यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

मुंबईच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रातही आज सभांचा धडाका आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली ताकद दाखवणार असून, उत्तर महाराष्ट्रातील मतदारांना महायुतीकडे खेचण्यासाठी त्यांनी विशेष रणनीती आखली आहे. तर मराठवाड्याचे केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी भव्य सभा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार अहिल्यानगरमध्ये तोफ डागणार असून, त्यांच्या भाषणात कोणाचे वाभाडे निघतात याची उत्सुकता सर्वांना आहे.

उपराजधानी नागपुरातही थंडीचा कडाका वाढला असला, तरी राजकीय वातावरण मात्र तापलेले आहे. नागपुरात पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या थेट घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदारांशी संवाद साधण्याची संधी उमेदवार सोडताना दिसत नाहीत. थंडीतही घाम फोडणाऱ्या या प्रचाराने नागपुरातील राजकीय समीकरणे शेवटच्या क्षणी बदलू शकतात अशी चिन्हे आहेत.

या निवडणुकीत मराठी अस्मिता, विकास, भ्रष्टाचार आणि नागरी सुविधा हे मुख्य मुद्दे केंद्रस्थानी राहिले आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांचे विभाजन थांबणार की महायुतीच्या 'वचननाम्या'चा प्रभाव मतदारांवर पडणार, याचे उत्तर आता 15 जानेवारीच्या मतदानातूनच मिळेल. आजच्या या 'सुपर संडे'ने प्रचाराची सांगता एका निर्णायक वळणावर आणून ठेवली आहे.

हेही वाचा: Thane Election 2026: तुमच्या प्रभागात कोण उभा आहे? उमेदवारांची 'A टू Z' यादी एका क्लिकवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number