Local Body Election in Maharashtra Election : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुक मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला? न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना होणार असताना सर्वच नगरपरिषदांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करता येतील का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विचारला आहे

Local Body Election in Maharashtra Election : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुक मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला? न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला न्यायालयीन वळण लागल्यानंतर आता निकालाच्या तारखेबाबत नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र काही नगरपरिषदांमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्यानंतर या भागांसाठी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचा सुधारित आदेश 29 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. या बदललेल्या कार्यक्रमाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

अंबाजोगाई, पैठण, कोपरगाव, आणि उदगीरमधील याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने विचारले, 'सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर करता येतील का?" यावर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी मंगळवारी दुपारी निवेदन सादर केले जाईल, असे सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत, तेथील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य पोहोचविण्यात आले आहे. न्यायालयाने या ठिकाणच्या निवडणुकीला परवानगी दिल्याने मतदान प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे.

हेही वाचा: Local Body Election in Maharashtra: हिंगोली स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये गोंधळ; मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि EVM बिघाडाच्या तक्रारींनी मतदानाची सुरुवात

काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयावर दाखल याचिकांवर सोमवारी पुन्हा सुनावणी झाली. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी सर्वच ठिकाणांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला लावणे शक्य आहे का याबाबत स्पष्टता मागितली. आयोगाने त्याबाबत तांत्रिक आणि प्रशासकीय स्थितीचा अहवाल देण्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, आज राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले आहे. सुमारे

आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीही शक्तिप्रदर्शनासाठी मोठी मोहीम उभारल्याने वातावरण रंगतदार झाले आहे. मतमोजणी उद्या बुधवारी होणार असून निमशहरी भागातील मतदारांचा कौल कोणाकडे झुकतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Share Market Update : शेअर मार्केटची सुरुवात लालेलाल; सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला, तर निफ्टी 26,145 च्या खाली

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number