महाराष्ट्र वाऱ्यावर आहे ,महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नव्हे, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे
शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले त्यानंतर आज त्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ही आमची इच्छा आहे आणि आमची आदिवासी समाजाविषयीचा आदर आणि भावनेपोटी हा निर्णय आम्ही घेतला. द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर याव्यात म्हणून पाठिंबा दिलेला नाही,
संजय राऊत यांनी बोलताना राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे